Shop No. 5, ECP Vastu, Handewadi Road, Satav Nagar, Hadapsar.
Mon-Sat 10am-2pm and 5pm - 9pm   -   Sunday Closed

Blog


"Dr. Satish Zagade" is also Marathi Poet & Water colour Artist. He has published his first Marathi Poem Book nmaed "सरिता" in 2018.
He has done his water colour painting exhibitior at various places.



" सरिता " प्रकाशन सोहळा...

तसं पाहिलं तर माझ्या निरा गावी शाळेत असल्यापासूनच मी कविता करू लागलो. माझे मोठे भाऊ महेंद्रअण्णा तेव्हा कविता करीत व त्यांना केलेल्या कविता माझ्या नजरेस पडत. मी त्या वाचून काढी. कदाचित त्याचाच प्रभाव अजाणतेपणे माझ्यावर झाला असावा.

नंतर मात्र वैद्यकीय शिक्षणानिमीत्त मी पुण्यात आलो व माझे विचारक्षितिज आणखीनच विस्तारले, जाणिवा समृद्ध झाल्या. मित्रांच्या तोंडून त्याच्या असणाऱ्या प्रेमाच्या काही गोष्टी समजू लागल्या. त्या काळी विविध कार्यक्रमांतून मी प्रसिद्ध कवींच्या कविताही ऐकू लागलो . त्यामुळे माझे कवितालेखन बहरू लागले. मुळात कविता करताना पुस्तक वगैरे प्रकाशित करायचे असा हेतू नव्हता. मात्र काही मित्रांच्या आग्रहाने हा योग जुळून आला.


🏠घर🔫बंदुक🍵बिर्याणी………निमित्ताने काही सुचलेले.

दो बिघा जमिन/आवारा/रोटी कपडा और मकान ने जसे व्यवस्थेला जाब विचारले, अनुत्तरित करून सोडले अगदी तसेच नागराज यांचा घर बंदूक बिर्याणी अंतर्मुख करून सोडतो.

कोणी घरासाठी बंदूक हाती घेतो तर कोणी तेच घर वाचवण्यासाठी बंदूक खाली ठेवतो. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत माणसाच्या हक्कांसाठी कोणाच्या हातात नकळतपणे बंदूक येते नि सुरू होतो त्यांचा मुलभूत हक्कांसाठी संघर्ष.

एकीकडे याच मुलभूत हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या समाजाच्या एका अंगाला अट्टल चोर दरोडेखोर नि खुनी संबोधून त्यांच्या मागावर वेगवेगळी यंत्रणा सतत सोडली जाते तर एकीकडे गर्भश्रीमंत धनदांडगे अगदी खाऊन खाऊन अजीर्ण होऊन ही अधिक का अधिक भुकेसाठी हव्यासापोटी लोकांचें मुलभूत हक्क हिरावून घेऊन ही राजरोसपणे मोकाट फिरतात पद पैसा प्रतिष्ठा उपभोगतात!!!

गंभीर विषय विनोदी ढंगानेमांडण्याचा नविनच प्रयोग कौतुकास्पद आहे,सयाजी शिंदे चा अभिनयाबद्दल काय बोलावे,मी पाहिलेल्या काही भुमिका जितकी चीड निर्माण करून देते तितकीच ही भुमिका हासवते,नागराजचा अभिनेता म्हणून वावर ही ठसा उमटवतो विशेषतः माफीनामा च्या वेळेची अगतिकता केवळ नि केवळ उत्कृष्ट च बाकी नेहमीची नागराज ची पलटण ( अति सर्वत्र वर्जयेत या नुसार),सैराटचे त्रिकुट,फ्यंड्री चा जब्या ,पिस्तुल्या ....दि मंडळी कंटाळवाणी वाटण्याऐवजी अधिक छाप पाडून जाते फक्त,सुरवातीची २/३गाणी जरा जास्तच वाटतात बाकी सगळं च नेहमीप्रमाणे नागराजमय 👍🏻

डॉ.मीना सतिश


" बालशिवाजी "

इयत्ता चौथी ची गोष्ट, त्यावेळी आंतरशालेय आंतरराज्य नाट्यस्पर्धेला माझी निवड झाली ती निवड स्वर्गेबाईंनी गुणवत्तेवरूनच केली अर्थातच हे आज कळतय, आम्हा सर्वांचे मराठी वाचन घेतले गेले नि त्यातुन माझी निवड झाली...

हे नाटक दोन पात्री असले तरी दुसरें पात्रं नाममात्र च होतें अशा या महाराजांच्या बालपणावर अधारीत,"बालशिवाजी"या नाटकामधे दस्तुरखुद्द " बालशिवाजी "या पात्रासाठी माझी निवड झाली.(अशाप्रकारे माँसाहेब जिजाऊ, शहाजीराजे, महाराज नि पुढे त्यांचा छावा माझ्या आयुष्यात आले नि कायमच राहीले) .

आजही नाटकातील एक संवाद अजुन माझ्या कानात रुंजी घालतात...."नाही नाही त्याला माफी नाही "कोण आहे रे तिकडे? पंत त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले जावे !! (विषय अर्थातच आया बहिणींच्या अब्रू संदर्भात)अशा या संवादासाठी मी आवाजाची अतिउच्च पातळी गाठण्यात अयशस्वी ठरले होते,नि आम्हाला द्वितीय पारितोषिकावर समाधान मानावे लागले.😊

पण माझ्या वडिलांना कामामुळे वेळेत नाटक पहायला यायला जमले नाही . ते बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा पडत असताना आले नि त्याची नि माझी विंगेतुनच नजरानजर झाली नि त्यांच्या चेहर्यावरील कौतुकमिश्रित विश्वास पूर्ण हावभाव बघून वाटलें बस् "याच साठी केला होता अट्टाहास" आजही हे आप्पांचे हावभाव मला आयुष्याच्या प्रत्येक चढ‌उतारावर माझ्यासोबत सावली सारखें साथ देत असतात असो.😌 अर्थिक परिस्थितीमुळे नाटकाचे फोटो घेता आले नाही ……

पण पुढे माझ्या समितच्या फोटोच्या रुपात तो प्रसंग नि अनुभव पुन्हा आठवत राहीला................

डॉ.मीना सतिश


Art Gallery

Some of water color landscapes painting prepared by - Dr. Satish